Shreya Maskar
आजकाही महिलांना जास्त जड, काठा पदराची साडी नेसणे अवघड जाते. तसेच रोजच्या धावपळीत ती नीट सांभाळता येत नाही. तेव्हा तुम्ही हलकी साडी शोधता. हली आणि स्टायलिश साडी नेसायची असेल तर शिफॉन साडी उत्तम पर्याय आहे.
शिफॉन साडी उन्हाळ्यात आणि गरम हवामानात घालण्यासाठी उत्तम आहे, कारण ती हलकी, हवेशीर आणि आरामदायक असते. तुम्ही ऑफिस, पार्टी, लग्न येथे नेसू शकता.
शिफॉन साड्यांचे बाजारात अनेक प्रकार पाहायला मिळतात. उदा, शुद्ध शिफॉन, प्रिंटेड, फ्लोरल, शिफॉन-जॉर्जेट, शिफॉन-सिल्क, प्लेन, क्रेप प्रिंटिंग, स्टोनवर्क इत्यादी.
शिफॉन ब्लाउज सिल्क, कॉटन, टिश्यू यांसारख्या फॅब्रिकच्या साडीवर शोभून दिसतो. तुम्ही साडीच्या काठाच्या रंगाचा किंवा डिझाईनचा ब्लाउज निवडा.
शिफॉन ब्लाउज पेस्टल रंग (फिकट गुलाबी, निळा, हिरवा), क्लासिक काळा, पांढरा, चमकदार रंग (लाल, निळा, गुलाबी) यांसारख्या रंगांमध्ये खूप सुंदर दिसतात. तसेच तुम्ही पेस्टल-कॉन्ट्रास्ट रंगसंगती देखील ट्राय करू शकता.
प्रिंटेड शिफॉन साडीवर साध्या रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज निवडा. जेणेकरून साडीचे सौंदर्य उठून दिसेल.
शिफॉन ब्लाउज आजकाल वेगवेगळ्या प्रकारात येतात. उदा बॅकलेस आणि डीप नेक, हाय-नेक, नॉटेड बॅक, रफल स्लीव्हज , लेस आणि एम्ब्रॉयडरी इत्यादी
शिफॉन ब्लाउज तुम्ही त्याची नाजूकता लक्षात घेऊन डिझाइन करा. नक्षीदार वर्क, भरतकाम असलेले शिफॉन ब्लाउज सिंपल शिफॉन साडीवर उठून दिसतील.