Shreya Maskar
आजकाल साडी- ब्लाउजमध्ये कॉन्ट्रास्ट रंगाचा ट्रेंड आला आहे. पूर्वी साडी आणि ब्लाउज सेम रंगाचे असायचे पण आता तसे नाही. साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट ब्लाउजची निवड केली जाते. ज्यामुळे तुमचा लूक अधिक खुलून येतो.
साडीच्या रंगावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालून स्टायलिश, क्लासी लूक करा. कॉन्ट्रास्ट रंगाचे हटके कॉम्बिनेशन पाहूया. यामुळे साध्या-सिंपल साडीला देखील स्टायलिश लूक येतो.
कॉन्ट्रास्ट रंगाचे बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे लाल साडीवर हिरवा ब्लाउज परिधान करा. हिरव्या रंगाची साडी असेल तर त्यावर लाल ब्लाउज अगदी छान खुलून दिसेल. तसेच तुम्ही लाल साडीवर काळ्या रंगाचा ब्लाउज घालू शकता.
साडी-ब्लाउजसाठी पोपटी-गुलाबी हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन देखील चांगले दिसते. पोपटी, फिकट हिरवा, मोरपंखी रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचे ब्लाउज सुंदर दिसते.
पिवळ्या रंगाच्या काठापदराच्या साडीवर जांभळ्या रंगाचे ब्लाउज सुंदर दिसेल. तसेच पिवळ्या साडीवर गुलाबी, लाल, हिरवे, जांभळ्या रंगाचे ब्लाउज घाला.
मोती रंगाची साडीवर लाल रंगाचे ब्लाउज परिधान करा. साडी डार्क रंगाची असेल तर ब्लाउज फिकट रंगाचा घाला.
गुलाबी रंगाच्या साडीवर काळ किंवा चंदेरी रंगाचे ब्लाउज परिधान करा. या सर्व रंगसंगती पारंपरिक आणि वेस्टन साडीवर शोभून दिसतील.
भरजरी साडीवर सिंपल ब्लाउजची निवड करा. नाहीतर लूक खूप भरलेला वाटेल. तसेच जर साडी सिंपल असेल तर सुंदर नक्षीदार, भरजरी ब्लाउज परिधान करा.