Shreya Maskar
कलिंगडाच्या सालीत भरपूर पाणी, व्हिटॅमिन ए, सी, बी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे चेहऱ्यावरील सूज, जळजळ आणि पुरळ कमी करतात. कलिंगडाची सालीचे फेसमास्क त्वचेला हायड्रेट ठेवते, टॅनिंग दूर होते.
कलिंगडाच्या सालीचे फेसमास्क बनवण्यासाठी कलिंगडाची सालं, गुलाबपाणी, चंदन पावडर, एलोवेरा जेल इत्यादी साहित्य लागते.
कलिंगडाच्या सालीचे फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम कलिंगडाच्या सालीचा जो वरचा पांढरा भाग असतो, तो काढून एका वेगळ्या बाऊलमध्ये ठेवा.
यात गुलाबपाणी घालून मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्या. पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात चंदन पावडर आणि एलोवेरा जेल मिक्स करा. अशाप्रकारे फेसमास्क तयार झाला.
कलिंगडाच्या सालीचा फेसमास्क आठवड्याभरातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावा. जेणेकरून चेहरा चांगला ग्लो करेल आणि तुम्ही सणासुदीला सुंदर दिसाल.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी फेसमास्कमध्ये चंदन पावडर आणि कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी एलोवेरा जेल मिसळा. जेणेकरून त्वचा मऊ-मुलायम राहील.
चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर फेसमास्क लावा आणि 15-20 मिनिटे ठेवून द्या. यातील घटक चेहऱ्याला पोषण देतील आणि त्वचा हायड्रेट राहील.
त्यानंतर चेहरा कोमट किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यावर भरपूर मॉइश्चराइजर लावा. मास्क लावण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट करा.