Shreya Maskar
गाजर फेशियल क्रीम बनवण्यासाठी गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. ३-४ शिट्ट्यांमध्ये गाजर मऊ होईल.
गाजर थंड झाल्यावर मॅश करा. तसेच तुम्ही ब्लेंडरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवू शकता. पेस्ट जास्त पातळ करू नका.
मॅश केलेल्या गाजरांमध्ये मध मिसळा. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल देखील टाकू शकता. ज्यामुळे त्वचा कोरडी होईल.
सामान्य किंवा तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी दही वापरा. सर्व घटक चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट २-३ मिनिटे बाजूला ठेवा.
पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर गाजराचा फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटे मास्क चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर न विसरता चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्रीम निवडा. यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येईल.
महिन्यातून ४-५ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेवरील पिंपल्स-काळे डाग कमी होतील. तसेच थंडीत त्वचा कोरडी पडणार नाही.
कोणताही घरगुती उपाय करताना त्याची आधी पॅच टेस्ट करा आणि मगच वापर करा. जेणेकरून त्वचेला कोणतीही नुकसान होणार नाही.