Manasvi Choudhary
ऋतू बदलण्याचा आरोग्यावर देखील परिणाम होतो. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात शरीराच्या अनेक भांगाचे दुखणे वाढते. हिवाळ्यात अनेकांना कानदुखीचा त्रास उद्भवतो यामुळेच हिवाळ्यात कानांची काळजी घ्यावी.
कान हा अवयव अत्यंत नाजूक असतो कानाच्या पडद्याला जखम झाली की वेदना असह्य होतात.कानामध्ये मळ, कान जड झाले तसेच कानामध्ये पाणी गेल्याने देखील कानदुखी होते.
हिवाळ्यात कान उबदार ठेवा. कानामध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. थंडीच्या दिवसात घराबाहेर पडताना कान झाकून ठेवा, उबदार टोपीने कान बांधा.
अंघोळ करताना कान सर्वात पहिले कोरडे करा. कानामध्ये पाणी गेल्याने कान दुखतात. कानाची योग्य स्वच्छता राखा. कानांमध्ये मळ साचून देऊ नका. कान वेळोवेळी साफ ठेवा.
कानाच्या पडद्याला इजा होऊ नये म्हणून कानामध्ये काडी (ear bud) किंवा इतर कोणतीही वस्तू घालणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.