Batata Rassa Recipe: गावरान पद्धतीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

बटाटा भाजी

बटाटा भाजी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. कोणती भाजी नसली की महिला सोपी अशी बटाटा भाजी बनवतात.

Batata Rassa Recipe

बटाटा भाजी सोपी पद्धत

बटाटा भाजी बनवण्याची पद्धत सोपी आहे. झटपट होणारी बटाटा भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. यानुसार बटाट्याचा लाल तिखट झणझणीत रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी आज पाहूया.

Batata Rassa

बटाट्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा?

बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी बटाटे, सुखं खोबरे, लसूण, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, हिंग ,कढीपत्ता, कांदा, लाल मसाला, हळद, कांदा, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Potato

बटाटे स्वच्छ धुवा

सर्वात पहिले बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून ते चौकोनी कापा. मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेले सुखं खोबरे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर यांची एकत्र पेस्ट करा.

Potato

मसाले परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता आणि कोथिंबीर पेस्ट चांगली परतून घ्या. त्यानंतर या मिश्रणात कापलेला कांदा परतून घ्या.

Batata Rassa Recipe

बटाटे मिक्स करा

या संपूर्ण मिश्रणात लाल मसाला, हळद, मीठ घाला आणि बटाटे मिक्स करा. २ ते ३ मिनिटे साधारण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या नंतर यामध्ये थोडेसे पाणी घाला. भाजी शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला आणि सर्व्हसाठी तयार करा.

Batata Rassa Recipe

next: Tina Dabi: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेल्या टीना डाबी कोण आहेत?

येथे क्लिक करा...