Dhanshri Shintre
दररोज दोन ते तीन वेळा शुद्ध मध ओठांवर लावा. यामुळे ओठांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ते मऊ राहतात.
लिंबाचा रस आणि साखर मिसळून हलक्या हाताने ओठांवर चोळा. यामुळे मृत त्वचा निघून ओठ अधिक गुलाबी दिसतात.
झोपण्यापूर्वी दररोज ओठांवर नारळाचे तेल लावा. यामुळे ओठांना ओलावा मिळतो, कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक रंग राखला जातो.
काकडीचा रस ओठांवर हलक्या हाताने लावा. यामुळे ओठांना थंडावा मिळतो, ताजेतवाने दिसतात आणि नैसर्गिक गुलाबी रंग पुन्हा उभा राहतो.
एक टीस्पून गुलाबपाणी व एक टीस्पून मध मिक्स करून ओठांवर लावा. या उपायामुळे ओठ मऊ होतात आणि नैसर्गिक गुलाबीपणा वाढतो.
हिवाळ्यात पाण्याचे सेवन कमी होत असल्याने शरीर आणि ओठ कोरडे होतात. त्यामुळे रोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
शिया बटर किंवा व्हिटॅमिन ई सारखे नैसर्गिक घटक असलेला लिपबाम दिवसातून २-३ वेळा वापरा, त्यामुळे ओठ सुरक्षित आणि मऊ राहतात.