Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेतली जाते. हिवाळ्यात वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर होतो.
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. तुमचीही त्वचा ड्राय झाली असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करा.
कोरफडीचा गर आणि दोन थेंब खोबरेल तेल एकत्र करून रात्री झोपताना चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
कोरफडीचा गर आणि दोन थेंब खोबरेल तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि थंडीमुळे होणारी जळजळ थांबवते.
बदाम तेलामध्ये 'व्हिटॅमिन ई' असते, जे कोरड्या त्वचेला पोषण देऊन नैसर्गिक चमक परत आणते.
चेहरा धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.