Shreya Maskar
हिवाळ्यात दही खावे की नाही? हे आपल्या आरोग्यावर अवलंबून आहे. मात्र तुम्ही जर दही खात असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
आयुर्वेदानुसार, दही थंड असल्यामुळे हिवाळ्यात ते खाणे टाळावे. कारण यामुळे सर्दी आणि खोकला होतो. तसेच आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात.
हिवाळ्यात रात्री दही खाणे टाळा. कारण ते थंड असते. हिवाळ्यात दही खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपार होय. दही खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पचनाची समस्या असलेल्या लोकांनी हिवाळ्यात दही खाऊ शकता. दह्यात प्रोबायोटिक्समुळे पचन सुधारते, गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी करते.
दही कधीही सामान्य तापमान (Room Temperature) वर ठेवून खावे. तसेच हिवाळ्यात दही खाण्याचे प्रमाण मर्यादित राहू द्या.
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत करतात. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेसाठी फायदेशीर ठरते. ते त्वचेला मऊ, मुलायम आणि चमकदार बनवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.