Shreya Maskar
हिवाळ्यात बाळाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांची तब्येत बिघडू शकते. म्हणून बाळाला अंघोळ घालण्याची योग्य वेळ जाणून घ्या.
थंडीत बाळाला जास्त वेळा अंघोळ घातल्याने ॲलर्जी होण्याचा धोका वाढतो. तसेच ताप, सर्दी आणि खोकला होऊ शकतो.
बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यामुळे कोमट पाणी देखील जास्त वापरू नये. तसेच बेबी प्रॉडक्ट्सचा जास्त वापर केल्याने ॲलर्जी होऊ शकते.
हिवाळ्यात बाळाला अंघोळ घातल्यावर त्याच्या शरीराला चांगले बॉडी लोशन लावा. जेणेकरून त्वचा मऊ आणि हायड्रेट राहील.
बाळाला चांगली झोप लागावी म्हणून तुम्ही रात्रीची अंघोळ घालू शकता. यामुळे बाळ निवांत झोपेल.
हिवाळ्यात बाळाला दुपारी अंघोळ घालणे कधीही फायदेशीर राहील. कारण तेव्हा वातावरणात थंडावा नसतो किंवा कमी असतो.
हिवाळ्यात जास्त वेळ बाळाला पाण्यात बसवू नये. अंघोळ झाल्यावर केसापासून ते पायाच्या नखापर्यंत बाळाला कोरडे करा. जेणेकरून त्याला थंडी वाजणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.