Shreya Maskar
हिवाळ्यात थंड पाणी पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते आणि शरीर हायड्रेट राहते. ज्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत नाही.
हिवाळ्यात आपल्या शरीराची गती मंदावते. त्यामुळे थंड पाणी प्या. जेणेकरून तुम्ही ताजेतवाने रहाल. तुम्हाला आळस येणार नाही.
थंड पाणी पिल्याने आणि आंघोळ केल्याने रक्ताभिसरण प्रणालीला चालना मिळते, जे रक्ताभिसरण सुधारते.
हिवाळ्यात थंड पाणी पिताना कायम एक गोष्ट लक्षात राहू दे. ती म्हणजे थंड पाण्याचे प्रमाण. हिवाळ्यात थंड पाणी पिण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.
हिवाळ्यात जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने शरीराला नुकसान होते.थंड पाण्याच्या अतिरिक्त सेवनामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवण्याची समस्या उद्भवते.
थंड पाण्यामुळे हिवाळ्यात पचनक्रिया मंदावू शकते. त्यामुळे पचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी पिऊ नये किंवा कमी प्यावे.
थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी सुरू होते. तसेच दातांची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे प्रमाणात थंड पाणी प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.