Shreya Maskar
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावून झोपा. यामुळे ओठ नैसर्गिकरित्या मऊ राहतात. गावरान शुद्ध तुपाचा वापर करा. जेणेकरून ओठांना कोणती एलर्जी होणार नाही.
तुपातील फॅटी ऍसिडस् ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे हिवाळ्यात कोरडे झालेले ओठ कायम मऊ राहतात. ओठ फुटत नाही.
घरात सहज उपलब्ध असलेला रामबाण उपाय म्हणजे ओठांना खोबरेल तेल लावा. तुम्ही थोडे कोमट खोबरेल तेल देखील लावू शकता.
ओठ मऊ आणि हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही मध ओठांना लावा. मधामधील पोषक घटक ओठ कोरडे पडू देत नाहीत. तसेच याची कोणती एलर्जी होत नाही.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपण पाणी कमी पितो. मात्र फुटलेल्या ओठांची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते.
चांगल्या दर्जाचे ओठांना मॉइश्चराइज करणारे लिप केयर प्रॉडक्ट वापर करा. जेणेकरून ओठ खराब होणार नाही.
तुम्ही ओठांना कच्चे दूध देखील लावू शकता. कारण ते ओठांना मॉइश्चराइझ करतात. मऊ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.