Shreya Maskar
हिवाळ्यात बऱ्याच लोकांच्या हाता-पायाला घाम येतो. ज्यामुळे कोणतेही काम करणे त्यांना कठीण होते. यावर घरगुती उपाय जाणून घेऊयात.
बेकिंग सोडा क्षारयुक्त असतो. त्यामुळे घामाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो.
बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा. तयार पेस्ट ५-१० मिनिटे हाताला लावून ठेवा आणि त्यानंतर हात स्वच्छ धुवा. यामुळे हाताला जास्त घाम येणार नाही.
हिवाळ्यात हात आणि पायाला जास्त घाम येत असेल. हातात ओलावा वाटत असेल तर ॲपल सायडर व्हिनेगर हाताला लावून रात्रभर ठेवा. सकाळी हात-पाय मऊ होतील.
हिवाळ्यात हाता-पायांना सतत घाम येत असेल तर, कच्च्या बटाट्याचे काप करून तळव्यावर चोळा आणि थोडावेळ हात धुवा.
सकाळी अंघोळ झाल्यावर हाता-पायांना तेलाने मालिश करा. यामुळे हात कोरडे राहतील. नारळाचे तेल आवर्जून लावा.
हिवाळ्यात हाताला वारंवार घाम येत असेल तर तणाव कमी करा, सैल- सुती कपडे वापरा, आणि त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.