ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात प्रत्येक नागरिकाने स्वत:ची खूप काळजी घेतली पाहिजे.
हिवाळ्यात जास्त थंडी असल्यामुळे लहान मुलांना अनेक आजार होत असतात.
या महिन्यात लहान मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते.
लहान मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील वातावरण उबदार ठेवण्याचे ट्राय करा. या दिवसांत घराचे दारं, खिडक्या शक्यतो बंद ठेवा.
या महिन्यात मुलांना जाड स्वेटरऐवजी थोडे हलके उबदार कपडे घाला.
लहान मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रोज त्यांची कोमट तेलाने मसाज करा.
हिवाळ्यात लहान मुलांना थंड पदार्थांपासून दूर ठेवा.
हिवाळ्याच्या महिन्यात लहान मुलांना विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.