Shraddha Thik
हिवाळ्यात अनेकदा भांडी धुताना हात सुन्न पडण्याची तक्रार असते. भांडी धुताना असे हात बर्फासारखे होतात.
अशा स्थितीत जर तुम्हालाही थंड पाण्यात काम करताना अशी तक्रार असेल तर आज काही टिप्स जाणून घेऊयात.
भांडी स्वच्छ करण्यासाठी काही वेळ गरम पाण्यात भिजत ठेवा. असे केल्याने त्यातील तेल आणि मसाले वेगळे होतील आणि डागही लगेच निघतील. आणि यामुळे तुमचे हातही गोठणार नाहीत.
थंड पाण्यापासून हात वाचवण्यासाठी तुम्ही ग्लव्हचा वापर करू शकता. भांडी धुताना हे घातल्याने तुम्ही अगदी सहज भांडी स्वच्छ करू शकता.
हिवाळ्यात जळलेली भांडी तासनतास घासण्याऐवजी स्क्रबमध्ये मीठ घालून जळलेल्या जागेवर घासा. असे केल्याने भांडी लवकर साफ होतात.
जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यावर टिश्यू पेपर पसरवा आणि बेकिंग सोडा घाला. काही वेळ असेच ठेवल्यानंतर ते धुवा. याने ते सहज स्वच्छ होतील आणि तुमचे हात गोठणार नाहीत.
भांडी पटकन स्वच्छ करण्यासाठी, त्यात व्हिनेगर घाला आणि 10-15 मिनिटे सोडा. असे केल्याने, तुम्हाला हिवाळ्यात त्यांना जास्त घासण्याची गरज नाही, ज्यामळे ते लगेच स्वच्छ होतील.