Vishal Gangurde
हिवाळ्याला सुरूवात झाल्याने अगदी निरोगी व्यक्तीलाही कधी ना कधी सर्दी होण्याची शक्यता असतेच.
सर्दीचा आजार पळवण्यासाठी एक सोपा उपाय आहे.
नाश्त्याला खाल्ला जाणारा शिरा तुम्हा सर्दीपासून आराम मिळवून देऊ शकतो.
गरम तव्यावर एक चमचा तूप घाला. या तुपात दोन चमचे बेसन घालून परतून घ्या
या तुपात चिमूटभर हळद घाला. त्यानंतर काळी मिरी पावडर, वेलची पावडर घाला. परतून झाल्यावर चिरलेला खजूरही घाला.
मिश्रण ढवळत राहा, त्यानंतर त्यात दूध घाला. हे मिश्रण थोडावेळ शिजवा, त्याला जास्त पातळ करू नका.
या प्रकारे शिरा करून त्याचे सेवन केल्याने मुलांचा कफ,सर्दी छुमंतर होते.
Next: गुगलवर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप