Shruti Vilas Kadam
वेल्वेट फॅब्रिक हिवाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा फॅब्रिक उबदार, रॉयल आणि पार्टीवेअरसाठी परफेक्ट दिसतो.
थंडीत फुल स्लीव्ह ब्लाऊज सर्वाधिक वापरले जातात. ते शरीर झाकून ठेवतात आणि साडी किंवा लेहंग्यासोबत एलिगंट लूक देतात.
बंद गळ्याचा, मॅन्डरीन कॉलर किंवा हाय नेक ब्लाऊज हिवाळ्यात जास्त उब देतात. हे ब्लाऊज पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लूकला सूट होतात.
जॅकेट ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे ब्लाऊज फॅशनेबल दिसतात आणि थंडीपासूनही बचाव करतात. साडी, सूट, लेहंगा सर्वांवर शोभून दिसतात.
हिवाळ्यात पॅडेड ब्लाऊज परफेक्ट पर्याय आहे. यामुळे बोल्ड, स्ट्रक्चर्ड फिट मिळते आणि थंडीपासून संरक्षणही होते.
वूलन निटेड ब्लाऊज हा हिवाळ्यासाठी खास डिझाईन प्रकार आहे. पारंपरिक साडीला स्टायलिश आणि उबदार लूक देतो.
ब्रोकेड फॅब्रिक जाड आणि उबदार असल्याने हिवाळ्यात खूप लोकप्रिय आहे. हे ब्लाऊज साडीला रॉयल आणि फेस्टिव्ह टच देतात.