Shruti Vilas Kadam
पांढऱ्या भातामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. वजन कमी करायचे असल्यास किंवा डायबिटीस असल्यास भात टाळावा.
ब्रेड, पिझ्झा बेस, बर्गर बन, नान, पेस्ट्री यांसारखे मैद्याचे पदार्थ उच्च कार्बयुक्त असतात आणि पचनासाठीही जड पडतात.
साखर, चॉकलेट्स, केक, मिठाया, कोल्ड ड्रिंक्स यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते कार्ब्सने भरपूर असतात.
बटाटे हे स्टार्चयुक्त कार्ब्सचे प्रमुख स्रोत आहेत. फ्राइज, चिप्स, वडा यांसारख्या पदार्थांमुळे वजन वाढू शकते.
इन्स्टंट नूडल्स, बिस्किटे, चिप्स, पॉपकॉर्न यामध्ये लपलेले कार्ब्स आणि साखर असते.
पास्ता, नूडल्स, मॅगी यांसारखे पदार्थ रिफाइन्ड कार्ब्सचे उदाहरण आहेत. लो-कार्ब डाएटमध्ये हे टाळावेत.
पॅक केलेले फळांचे रस नैसर्गिक फायबरशिवाय साखरयुक्त कार्ब्स देतात. संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते.