Wight Loss: जर तुम्हाला खरचं वजन कमी करायचं असेल, तर पुढील ३ महिने या ७ टिप्स फॉलो करा, व्हाल फॅट टू फिट

Shruti Vilas Kadam

अल्कोहोल पूर्णपणे बंद करा

अल्कोहोल मेटाबॉलिझम कमी करते, झोप बिघडवते आणि हार्मोनल बॅलन्स खराब करू शकते. पार्टीत स्पार्कलिंग वॉटर, लिम्बूपाणी असे नॉन-अल्कोहॉलिक पर्याय निवडा.

Weight Loss | yandex

वेट लिफ्टिंगचा समावेश करा

आठवड्यात 2–4 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. स्क्वॅट्स, डेडलिफ्ट, पुशअप्स, रोइंग यांसारखे बेसिक व्यायाम करा. हळूहळू वजन कमी करत राहा, त्यामुळे मसल्स वाढून मेटाबॉलिझम सुधारतो.

Weight Loss | SAAM TV

दररोज चालण्याचा नियम पाळा

रोज 8,000–10,000 पावले चालण्याचे टार्गेट ठेवा. चालल्याने मूड सुधारतो, ब्लड शुगर स्थिर राहते आणि स्टॅमिना वाढतो. सकाळी किंवा लंचनंतर छोटी वॉक उपयोगी.

Weight Loss | yandex

झोप नियमित आणि पुरेशी घ्या

दररोज एकच झोपण्याची व उठण्याची वेळ ठेवा. झोपेच्या आधी स्क्रीन वेळ कमी करा. हलके स्ट्रेचिंग, डीप ब्रीदिंग, मेडिटेशन वापरायामुळे झोप आणि स्ट्रेस दोन्ही सुधारतात.

Weight Loss Tips | freepik

प्रोसेस्ड फूड कमी करा, रिअल फूड वाढवा

जंक फूड, पॅकेट स्नॅक्स कमी करा. ताजी फळे, भाज्या, पनीर/दालसारखे प्रोटीन, संपूर्ण धान्य यांचा वापर वाढवा. “सिंगल-इंग्रेडिएंट” साधे अन्न सर्वोत्तम.

Fat Loss

“रूल ऑफ टू” पाळा

एक दिवस चुकला तरी निराश होऊ नका. सलग दोन दिवस चूक करू नका. जंक खाल्ले किंवा व्यायाम चुकला तरी पुढच्या दिवशी लगेच हेल्दी रूटीनला परत जा.

walking girl | yandex

सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात रहा

हेल्थ व फिटनेसवर लक्ष देणाऱ्या मित्रांकडे रहा. त्यांच्यासोबत व्यायाम करा, रेसिपीज शेअर करा, प्रेरणा घ्या. शक्य नसेल तर ऑनलाइन फिटनेस कम्युनिटी जॉइन करा.

Weight loss

हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन आहे बेस्ट, एकदा जाणून घ्या

Eyelashes Care
येथे क्लिक करा