Wifi On Side Effects : रात्री झोपण्यापूर्वी Wifi बंद करावा की सुरू ठेवावा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

वायफाय

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि वायफाय हे सर्वांसाठीच महत्वाचे झाले आहे. ऑफिस असो किंवा घरी 24 तास वायफाय सुरू ठेवून आपण काम करत असतो.

Wifi On Side Effects | pintrest

रात्री वायफाय सुरू ठेवावा की नाही?

अनेकजण रात्री देखील वायफायचे राउटर सुरूच ठेवतात? परंतु, रात्री झोपण्यापूर्वी वायफाय बंद करावा की सुरू ठेवावा? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Wifi On Side Effects | google

आरोग्यासाठी घातक

रात्री झोपण्यापूर्वी वायफाय बंद केल्याने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे शरीराला काय फायदे होतात ते जाणून घ्या.

Wifi On Side Effects

शांत झोप लागते

वायफाय राउटरमधून सतत रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी सोडल्या जात असतात. जरी या लहरींचे प्रमाण कमी असले, तरी काही वैद्यकीय संशोधनानुसार सतत अशा लहरींच्या संपर्कात राहिल्याने आपल्या शरीरातील मेलाटोनिन च्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. रात्री वायफाय बंद केल्याने मेंदूला शांतता मिळते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

Better Sleep Quality | saam tv

डोकेदुखी आणि मानसिक ताण कमी होतो

अनेक लोकांना सकाळी उठल्यावर सतत डोकेदुखी किंवा थकवा जाणवतो. घरामध्ये वायफाय आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सतत चालू असल्यामुळे निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी काही संवेदनशील व्यक्तींच्या मेंदूवर परिणाम करू शकतात. राउटर बंद केल्याने या लहरींपासून विश्रांती मिळते.

headache | pinterest

विजेची बचत

रात्रीच्या वेळी वायफाय राउटर बंद ठेवल्यामुळे वीजेची बचत होते. तसेच सलग चालल्यामुळे ओव्हरहीट होणाऱ्या राउटरचे आयुष्य वाढण्यासही मदत होते.

Energy Saving | google

सायबर सुरक्षितता

रात्री जेव्हा कोणीही इंटरनेट वापरत नसते, त्यावेळी राउटर बंद ठेवल्याने अनधिकृतपणे नेटवर्कचा वापर होणे किंवा सायबर अटॅकचा धोका पूर्णपणे टाळता येतो.

WiFi | google

NEXT: Vastu Tips For Purse Colour: लाल, पिवळी, हिरवी की निळी; वास्तुशास्त्रानुसार कोणत्या रंगाची पर्स वापरल्याने वाढते श्रीमंती? जाणून घ्या योग्य रंग

Vastu Tips For Purse Colour
येथे क्लिक करा..