Manasvi Choudhary
आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पैसे ठेवण्यासाठी पर्स वापरतात. पर्समध्ये पैसे, एटीएम कार्ड्स आणि महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित राहतात.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का? वास्तुशास्त्रानुसार पर्सचा रंग आणि त्याची स्थिती याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर होत असतो. चुकीच्या रंगाची किंवा अयोग्य पद्धतीची पर्स वापरल्याने खिशात पैसा टिकत नाही, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार विविध रंगांच्या पर्सचे काय महत्त्व असते आणि कोणती पर्स आर्थिक समृद्धीसाठी सर्वात शुभ मानली जाते, हे जाणून घ्या.
हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धीचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाची पर्स वापरल्याने आर्थिक स्थिती वेगाने सुधारते. जर तुम्हाला नवीन कामाच्या किंवा उत्पन्नाच्या नवीन संधी मिळवायच्या असतील, तर हिरव्या रंगाची पर्स वापरा.
तचॉकलेटी रंग हा पृथ्वीचे प्रतीक मानला जातो. हा रंग जीवनात आणि आर्थिक स्थिरता आणते. ज्यांचा खर्चावर नियंत्रण नसतो अशा व्यक्तींनी चॉकलेटी रंगाची पर्स वापरावी.
लाल रंग हा ऊर्जा, अग्नि आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची पर्स पैसे आकर्षित करते.
काळा रंग संपत्ती, ताकद आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानली जाते. अनेक जण काळ्या रंगाच्या पर्स आवडीने वापरतात. काळा रंग पैसा साठवण्यासाठी चांगला मानला जातो, परंतु काही वास्तू तज्ज्ञांनुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करू शकते.
पिवळा रंग हा समृद्धी, संपत्तीसाठी शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाचा संबंध गुरू ग्रहाशी असतो त्यामुळे पिवळी किंवा सोनेरी रंगाची पर्स आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत भाग्यवान मानली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.