Saam Tv
उन्हाळा आला की बाजारात आंबे पाहायला मिळतात.
वर्षभर लोक आंब्यांची वाट पाहत असतात. एकदा का आंबे बाजारात आले की लगेचच ते खरेदी करतो.
तुम्हाला माहितीये का? आंबे नक्की कोणत्या महिन्यात खाल्ले पाहिजेत? चला तर जाणून घेऊ.
आंबे पिकायला जास्त वेळ सुर्यप्रकाशाची गरज असते.
एप्रिल पेक्षा मे महिन्यात सुर्य प्रकाश जास्त असतो. कारण दिवस मोठे झालेले असतात.
जास्त सुर्यप्रकाशात आंबे गोडसर आणि रसाळ होतात. तसेच त्यात नैसर्गिक स्वाद विकसित होतो.
तुम्हाला जर अस्सल चवीचे रसाळ आंबे खायचे असतील तर तुम्ही मे महिना निवडा.
मे महिन्यात तुम्हाला स्वस्तात देवगड हापूस, बदामी, केसर अशा प्रकारचे आंबे मिळतील.