ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खूप लोक असा विचार करतात की मुलांना थोडासा चहा दिल्याने काय होणार आहे, पण हा त्यांचा मोठा गैरसमज आहे.
चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे मुलांमध्ये अॅलर्जी, बेचैनी, चिडचिड आणि निद्रानाश अश्या समस्या येऊ शकतात.
चहा प्यायल्याने मुलांची भूक कमी होते, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.
चहातील साखर आणि टॅनिनमुळे दात किडण्याची शक्यता असते. टॅनिन हे शरीरातील लोह शोषण कमी करतात.
चहामध्ये कॅफिन असते. कॅफिन हे झोपेवर परिणाम करते. त्यामुळे लहान मुलांना झोप न लागणे किंवा वारंवार जाग येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
चहा हा डाययुरेटिक असल्यामुळे शरीरातून पाणी कमी होते, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
लहान मुलांना जास्त चहा दिल्याने शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते, ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात.