Surabhi Jayashree Jagdish
इंटरव्ह्यूदरम्यान ऑफर केलेलं पाणी पिणं हा साधा वाटणारा मुद्दा असला तरी त्यामागे काही छोट्या गोष्टी दडलेल्या असतात. लगेच पाणी पिण्यामुळे तुमचं बॉडी लँग्वेज आणि फोकस प्रभावित होऊ शकतो.
इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच पाणी पिणं हे तुमची घाई किंवा अस्वस्थता दाखवतं. यामुळे समोरच्याला वाटू शकतं की तुम्ही नर्व्हस आहात. पहिल्या काही मिनिटांत शांत आणि स्थिर दिसणं जास्त महत्त्वाचं असतं.
पाणी घेताना हातांची हालचाल, ग्लास पकडण्याची पद्धत यावर लक्ष जातं. जर तुम्ही घाबरलेले असाल तर हे अधिक स्पष्ट दिसू शकतं. त्यामुळे सुरुवातीला स्वतःला स्थिर ठेवणं गरजेचं आहे.
इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं असतं. पाणी पिताना तुमचं लक्ष काही सेकंदांसाठी हटू शकतं.
इंटरव्ह्यूमध्ये स्वतःवर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. लगेच पाणी घेणं म्हणजे तुमचा परिस्थितीवर पूर्ण कंट्रोलमध्ये नाही असं वाटू शकतं. योग्य वेळ येईपर्यंत थांबणं अधिक प्रोफेशनल दिसतं.
इंटरव्ह्यू सुरू होताच पाणी पिणं म्हणजे बोलताना छोटा ब्रेक निर्माण होतो. यामुळे संवादाची फ्लो तुटू शकतो. सुरुवातीला संवाद सलग ठेवणं जास्त फायदेशीर ठरतं.
पाणी पटकन घेणं हा अनेकदा नर्व्हसनेसचा संकेत मानला जातो. यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स दाखवणं महत्त्वाचं असतं.
पाणी पिणं चुकीचं नाही, पण योग्य वेळ महत्त्वाची आहे. प्रश्नांमध्ये छोटा ब्रेक मिळाल्यावर किंवा घसा कोरडा वाटल्यास पाणी घेणं योग्य ठरतं. यामुळे तुमची प्रोफेशनल इमेज टिकून राहते.