Surabhi Jayashree Jagdish
मकर संक्रात जवळ आली असून दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात.
यावर्षीही महिला काळ्या साड्या परिधान करणार असतील. मात्र यामागे नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहितीये का?
पुरातन कथेनुसार, ज्यावेळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश केला तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र (Black clothes) परिधान केलेलं होतं
काळ्या रंगाचे कपडे बाहेरची ऊष्णता शोषून घेतात आणि शरीर उबदार ठेवतात.
म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रं नेसण्याची प्रथा आहे.
पांढरा रंग उष्णता परावर्तित करतात त्याउलट काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो.
मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात, हे यामागे वैज्ञानिक कारण आहे