Cooking Hacks: भाजीत मीठाचं प्रमाण जास्त झाल्यास काय कराल?

Surabhi Jayashree Jagdish

भाजीत मीठ

बऱ्याच वेळा भाज्यांमध्ये जास्त मीठ असते, ज्यामुळे त्याची चव खराब होते. अशा कठीण काळात तुम्ही काही हॅक्स वापूरन भाज्यांमदील मीठ कमी करू शकता.

लिंबाचा वापर

भाजीत मीठ खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. यामुळे भाजीतील अतिरिक्त मीठ संतुलित होतं.

बटाटा वापरा

भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर बटाट्याचे तुकडे करून भाजीत घाला. यामुळे मीठाचं प्रमाण जास्त लागत नाही

व्हिनेगर वापरा

जर भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर तुम्ही त्यात व्हिनेगर घालू शकता. यामुळे मीठाचे प्रमाण संतुलित राहतं.

दही मिसळा

जर मीठ मजबूत झाले असेल तर दही फेटून भाजीत मिसळू शकता. यामुळे भाज्यांची ग्रेव्ही घट्ट होईल आणि मीठही संतुलित राहील.

काजूची पेस्ट

जर भाजीमध्ये जास्त मीठ असेल तर तुम्ही काजूची पेस्ट बनवून त्यात मिक्स करू शकता. यामुळे भाजी अधिक चवदार होते.

नारळाचं दूध

नारळाच्या दुधामुळे जास्त प्रमाणात मिठाचं प्रमाण कमी होते. याने ग्रेव्ही देखील अप्रतिम होईल.

थंडीच्या दिवसांत केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी

hair loss | saam tv
येथे क्लिक करा