Manasvi Choudhary
वयाच्या ३० नंतर अनेक महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी, मेटाबॉलिझम, हार्मोन्स याचा परिणाम वजनावर होतो.
महिलांचे वजन वाढण्यामागची कारणे नेमकी काय आहेत ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वयाच्या ३० नंतर शरीराचा मेटाबॉलिज्म नैसर्गिकरित्या हळूहळू कमी होतो यामुळे शरीराची पचनशक्ती मंदावते.
नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे वयानुसार स्नायूंची झीज होते. स्नायूंच्या जागी चरबी जमा होते आणि वजन वाढते.
वयाची ३० नंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ताणतणाव येतो. तणावामुळे शरीरात 'कॉर्टिसॉल' स्ट्रेस हॉर्मोन वाढतो.
अनेक महिलांना जंक फूड, जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय असते यामुळे शरीरात चरबी साचते आणि वजन वाढते.
लग्नानंतर ३० नंतर गर्भधारणा, हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या वजनामध्ये वाढ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.