ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला ऑफिसमध्ये अनेकदा जाणवले असेल की, महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक थंडी वाजते पण यामगचे कारण काय, जाणून घ्या.
एसीचे तापमान कमी होताच, थंडीने त्रासलेली महिला शाल किंवा हु़डी वापरताना दिसते.
एका सर्वेक्षणादरम्यान असे समोर आले की , ज्या तापमानात पुरुष आरामात काम करतात, त्या तापमानात महिलांना अस्वस्थ वाटते. आणि त्यांना काम करण्यात अडचण येते.
महिलांना अधिक थंडी लागण्याचे कारण म्हणजे शरीरातल्या मेटाबॉलिक रेटमध्ये असलेला अंतर.
महिलांचा मेटाबॉलिक रेट पुरुषांपेक्षा थोडा कमी असतो. ज्यामुळे त्यांचे शरीर कमी ऊर्जा खर्च करते.
अशावेळी, त्यांच्या शरीरात उष्णता कमी निर्माण होते आणि त्यांना जास्त थंडी जाणवते. संशोधनानुसार, महिलांना २५ अंश सेल्सिअस तापमान आवडते.
पुरुषांना २२ अंश सेल्सिअस तापमानात काम करायला आवडते.
NEXT: काय सांगता? एका पालीची किंमत तब्बल ६० लाख रुपये; काय आहे खास?