ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोके गेको ही पाल जगातली दुर्मिळ पाल आहे. या पालीवर रंगीबेरंगी ठिपके आहेत.
ही प्रजाती, ईशान्य भारतातील जंगलामध्ये झाडांना आणि दगडांवर चिपकलेली असतात.
या पालींना केको साप या नावानेही ओळखले जाते.
या एका पालीची किंमत चक्क ६० लाख रूपये आहे. टोको गेको आशियामध्ये सर्वात जास्त तस्करी करण्यात येणारी प्रजाती आहे.
चीन आणि आग्नेय आशियामध्ये या पालाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
पारंपरिक चीनी औषधांमध्ये तसेच अस्थमा, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
यांना सुकवून पावडरच्या स्वरुपात बाजारात खूप जास्त किंमतीत विकले जातात. तसेच या पालाचे वैज्ञानिक महत्व देखील आहे.