Manasvi Choudhary
६ जुलैला सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसणार आहे. आषाढी वारीनिमित्त सर्व वारकरी पंढरपूरला निघाले आहे.
आषाढी वारीची जुनी परंपरा आजही सुरू आहे.
आषाढी वारीमध्ये महिला डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरच्या दिशेने जातात.
मात्र महिला डोक्यावर तुळस का घेतात यामागचं कारण माहितीये का?
शास्त्रानुसार, तुळसीला विशेष महत्व आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा पूजेमध्ये तुळस असते.
श्रीविष्णूच्या पुजेत तुळशीला महत्व आहे यामुळे विठ्ठाला देखील ती प्रिय आहे.
तुळस हे शुद्धता, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे, डोक्यावर तुळस घेऊन चालणे, म्हणजे विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती आणि निष्ठा अर्पण करणे, असे मानले जाते
काही लोकांच्या मते, तुळस हवेतील हानिकारक वायू शोषून घेते आणि ऑक्सिजनची पातळी वाढवते. त्यामुळे, वारीच्या प्रवासात तुळस डोक्यावर घेतल्याने, महिलांना शुद्ध हवा मिळते, असे मानले जाते.