Manasvi Choudhary
आपण सर्वच घड्याळ घालतो, मात्र घड्याळ डाव्या हातात का घालतात हे माहीत असायला हवे.
घड्याळाचा शोध लागला तेव्हा घड्याळ हातावर घातलण्याची पद्धत नव्हती.
यावेळी, पूर्वी चईन किंवा टेकू असलेली छोटीछोटी घड्याळं खिशामध्येच ठेवली जायची. जेव्हा वेळ पाहायची असेल तेव्हा खिशातून ते काढलं जायचं आणि वेळ पाहून ते पुन्हा खिशातच ठेवलं जायचं.
मात्र,काही काळानंतर घड्याळ हातावर घालण्याचा ट्रेंड सुरु झाला
यावेळी अनेकजण उजव्या हाताने काम करत असल्याने घड्याळ हे डाव्या हातात घालू लागले.
लिखाण काम असो किंवा इतर काम करताना अडथळा येऊ नये म्हणून घड्याळ डाव्या हातात घालायला सुरुवात झाली
याशिवाय, जेवताना किंवा काम करताना घड्याळ आपटून फुटू नये यासाठी लोक ते डाव्या हातातच घालू लागले.
मात्र आजकाल फॅशन म्हणून घड्याळ हे दोन्ही हातात घातले जाते.