Manasvi Choudhary
शाळा,कॉलेज, ऑफिस किंवा एखाद्या कार्यक्रमाला मुली व मुले फॉर्मल कपड्यांवर बुट घालतात.
बुटांचे विविध प्रकार असतात ऑफिसला, कार्यक्रमात फॉरमल म्हणून वेगळे असे अनेक प्रकार बुटांचे आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे का बूटांबरोबर मोजे का घालतात?
सॉक्स शिय बुट घातल्याने ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही यामुळे सॉक्सशिवाय बुट घालू नये.
दिवसभरात चालल्याने पायाला घाम येतो सॉक्सशिवाय बूट घातले असतील तर घाम सुकला जात नाही यामुळे पायांमध्ये ओलसरपणा वाढतो आणि त्वचेवर परिणाम होतो.
बूटांमध्ये सॉक्स न घातल्याने स्किन एलर्जी होते. लेदर किंवा अन्य कोणत्या प्रकारचे बूटांमुळे स्किन एलर्जी होऊ शकते.
सॉक्समुळे फक्त पायाचा घामच निघून जातो असं नाही तर सॉक्स पायात असल्यामुळे तळवे अतिशय सॉफ्ट आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.
बूट घेताना ते योग्य आकाराचे बूट घेणे महत्वाचे आहे घट्ट बूट घालणे पायांसाठी घातक होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.