Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील इगपुरी हे ठिकाण पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे.
पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
कोणत्याही ऋतूत पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. डिसेंबरचा महिना सुरू असल्यामुळे सध्या येथे दाट धुकं अन् कडाक्याची थंडी पडली आहे.
इगतपुरीतील भावली धरण, कुरुंग किल्ला, डोंगरदरे, घनदाट जंगल, नद्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
इगतपुरीतील सांधण व्हॅलीला महाराष्ट्राची ग्रँड कॅनियन म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट द्या.
इगतपुरी येथे ऊंट दरी हे ठिकाण आहे. उंटासारख्या रचनेमुळे हे नाव पडलं आहे. हिवाळ्यात हे ठिकाण अतिशय सुंदर दिसते.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येथे पर्यटक खास भेट देतात. ट्रेकिंगसाठी पर्यटक येतात.