ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर कोणताही प्रवास आरामात किंवा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होत असेल तरच त्या प्रवासाचा आनंद घेता येतो.
रोड ट्रिपचा प्लान करताना आपण बस किंवा कारने प्रवास करतो. अनेकांना यावेळी मळमळणे किंवा उलटी होणे असे त्रास जाणवतात.
प्रवास करताना उलटी होणे किंवा मळमळणे याला मोशन सिकनेस म्हणतात. परंतु यामागील कारणे काय, जाणून घ्या.
शरीरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मज्जासंस्था. जेव्हा ती असंतुलित होते तेव्हा मनात गोंधळ निर्माण होतो. यामुळे उलट्या होऊ शकतात.
जेव्हा डोळे काहीतरी वाचतात किंवा पाहतात तेव्हा ते स्थिर असल्याचे दिसते. परंतु शरीर हालचाल करत असल्याने इंद्रिये मेंदूला मोशनचे सिग्नल देतात.
जर तुम्हाला बसने किंवा कारने प्रवास करताना उलटी सारखे वाटत असेल तर काहीही वाचणे किंवा पाहणे टाळा.
प्रवास करताना तोंडात वेलची किंवा लवंग चावू शकता. यामुळे उलटी होणार नाही.