Manasvi Choudhary
जर तुम्ही कधी घड्याळ, स्मार्टवॉच किंवा भिंतीवरील घड्याळाच्या जाहीरातीकडे पाहिले असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. ती गोष्ट म्हणजे अनेकदा जाहीरातींमध्ये वेळ नेहमी 10:10 हीच दाखवली जाते.
मात्र घड्याळांच्या जाहीरातींमध्ये 10:10 ही वेळ का दाखवतात. यामागचे नेमके कारण काय ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
10 वाजून 10 मिनिटांनी, दोन्ही काटे V आकारात येतात यामुळे डायलला एक डिझाईन प्राप्त होते. काटे एकमेकांवर येत नाहीत त्यामुळे संपूर्ण घड्याळ सहज दिसतो.
घड्याळ कंपन्यांचे लोगो हे 12 वाजण्याच्या खाली असतात त्यामुळे 10:10 वाजलेले दाखवले की तो भाग झाकला जात नाही.
10:10 वाजताचे काटे ब्रँडच्या लोगोला दोन्ही बाजूंना वेढतात त्यामुळे डायल आकर्षक दिसतो. 10:10 वाजताचा घड्याळ ग्राहकांना आकर्षक करतो.
10:10 ही सर्वात लोकप्रिय वेळ आहे. पूर्वी कंपन्या 8:20 ही वेळ दाखवायच्या, परंतू नंतर 10:10 ही वेळ अधिक लोकप्रिय झाली.
आजकाल मासिके, ऑनलाईन शॉपर्स, दुकांनामध्ये दिसणाऱ्या बहुतेक घड्याळे ही 10:10 वेळेवर सेट केलेली असतात.