History Class : १९७१ च्या युद्धावेळी ताजमहाल का झाकण्यात आला होता?

Surabhi Jayashree Jagdish

हल्ल्याचा बदला

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आलं.

गंभीर परिस्थिती

सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, युद्ध भडकण्याची भीती आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच, युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलंय.

ब्लॅकआऊट

या मॉकड्रिल अंतर्गत देशाच्या विविध भागात ब्लॅकआउटची योजना आखण्यात आलीये.

साल १९७१

१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आग्र्यातही असाच एक ब्लॅकआउट झाला होता.

ताडपत्री

त्यावेळी ताजमहालला ताडपत्रीने पूर्णपणे झाकण्यात आलं होतं.

दिसू नये

शत्रूच्या सैन्याला विमानातून ताजमहाल दिसू नये आणि त्यांनी हल्ला करू नये यासाठी ताजमहाल झाकण्यात आला होता.

जंगलाचं स्वरूप

त्यावेळी ताजमहाल केवळ ताडपत्री आणि गोणपाटाने झाकलेला नव्हता. तर त्याभोवती झाडांच्या फांद्या आणि झुडपं लावून त्याला जंगलासारखे स्वरूप देण्यात आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

येथे क्लिक करा