Dhanshri Shintre
पूर्वी अनेक गावांच्या सीमारेषेवर चिंचेचं झाड लावलेलं आपण नेहमीच पाहिलं किंवा ऐकलेलं असतं.
चिंचेच्या झाडात अर्थिंग क्षमता असते, ही क्षमता विजेच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
पावसाळ्यात विजेचा धोका टाळण्यासाठी गावाभोवती चिंचेची झाडं लावली जात, जी विजेचा प्रवाह जमिनीत उतरवून गावाचे सुरक्षित रक्षण करतात.
चिंचेच्या झाडाची मुळे खोलवकर जातात आणि त्यात विजेचं वहन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. यामुळे वीज खेचली जाऊन जमिनीत मिसळते, ज्याने नुकसान टळतं.
वादळात चिंचेच्या झाडाजवळ थांबू नये, कारण ते विजेला आकृष्ट करतं आणि ती थेट जमिनीत सोडतं.
चिंचेची झाडं विजेपासून संरक्षण तर करतातच, शिवाय सावली, फळं आणि लाकूड देऊन गावकऱ्यांच्या उपयोगातही येतात.
चिंच आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयुक्त असल्याने पूर्वी ती घराजवळ लावली जायची, जेणेकरून गरज पडल्यास लगेच वापरता येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.