Manasvi Choudhary
वारकरी गळ्यात तुळशीची माळ का घालतात यामागचं कारण जाणून घेऊया.
वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला खूप महत्व आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ तो वारकरी ही खरी ओळख मानली जाते.
भगवान विष्णू आणि कृष्णाला तुळस प्रिय आहे. त्यामुळे विठुरायाचे भक्त वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.
तुळशीची माळ धारण केल्याने शरीर आणि मनाला शुद्धता प्राप्त होते
गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर ती पुन्हा कधीही काढू नये असा नियम आहे.
तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजल माळ स्वच्छ धुवून घालावी.