Manasvi Choudhary
आषाढी एकादशी निमित्त सर्व ठिकाणाहून पालखी घेऊन भाविक, वारकरी पंढरपूरला निघाले आहेत.
पंढरपूर या शहराला मोठा एतिहासिक वारसा लाभलेला आहे.
पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिर, पुंडलिक मंदिर, गोपाळपूर, चंद्रभागा नदी ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
मात्र शहराला पंढरपूर हे नाव कसं मिळालं हे जाणून घेऊया. पंढरपूर या नावाचा संबंध पांडुरंग किंवा विठ्ठल या देवाशी आहे.
पंढरपूरला पौंडरीकक्षेत्र असे देखील म्हणतात ज्याचा अर्थ पांढरा कमळाचे क्षेत्र असा आहे.
पूर्वीच्या पंडरीपूर या नावाने पंढरपूर हे नाव पडलं आहे.
पंढरपूर हे शहर भिमा नदीच्या काठावर वसलेले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रातील पांढऱ्या वाळूमुळे शहराला पांढरी हे नाव पडलं असं म्हटलं जाते.