Saam Tv
वाळकेश्वर परिसर याचा संबंध भगवान शिवाशी लावला जातो. इथल वाळकेश्वर मंदिर मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची विशेष रचना आणि आजूबाजूचा परिसर यामुळे या परिसराला वाराणसीचं महत्त्व आहे.
वाळकेश्वर मंदिराशी संबंधित एक आख्यायिका सांगितली जाते.रामायणाच्या काळात श्रीराम लंकेकडे जात असताना या परिसरात थांबले होते आणि येथेच त्यांनी शिवाची वाळूची पिंड बनवली होती.
वाळू आणि त्यापासून तयार झालेला ईश्वर त्यामुळे या ठिकाणाला वाळकेश्वर असे नाव पडले. असे सांगितले जाते.
लंकेकडे जाताना जेव्हा श्रीरामांना वाटेत तहान लागली तेव्हा त्यांनी बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला. पाताळगंगेचे पाणी रामांनी बाण मारून बाहेर काढल्याने या तलावाला बाणगंगा असे नाव पडले.
बाणगंगा तलावाच्या आसपास अनेक छोटी - मोठी मंदिर पाहायला मिळतात. तलाव, मंदिर आणि जुन्या वास्तुंमुळे या परिसराला एक वेगळंच धार्मिक आणि ऐतिहासिक रूप मिळालं आहे.
काशीप्रमाणे वाळकेश्वर परिसरात शिवभक्ती मंदिर, धार्मिक विधी आणि पवित्र जलाशी संबंधित श्रद्धा पाहायला मिळतात. याच धार्मिक वातावरणामुळे मिनी काशी म्हणून संबोधले जाते.
मुंबईच्या दक्षिण भागातील मलबार हिल परिसरात असलेल्या वाळकेश्वर आणि तेथील बाणगंगा तलाव या परिसराला मुंबईची मिनी काशी किंवा मिनी बनारस म्हटले जाते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही .