Surabhi Jayashree Jagdish
मुंबईत सध्या उकाडा प्रचंड वाढला असून थंडावा मिळावा म्हणून अनेकजण विकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करतायत. मात्र ऑफिसच्या सुट्ट्या कमी असल्यामुळे लोक आता घराजवळची ठिकाणं निवडू लागले आहेत.
कांदिवलीत आसपासची काही ठिकाणं अशी आहेत, जिथे निसर्ग, शांतता, समुद्रकिनारा आणि मनोरंजन यांचा एकत्र अनुभव मिळतो. कमी वेळात फ्रेश वाटावं आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवता यावा, यासाठी ही ठिकाणं उत्तम पर्याय ठरतात.
कांदिवलीपासून अगदी जवळ असलेलं हे राष्ट्रीय उद्यान मुंबईतील सर्वात मोठं हिरवळीचं ठिकाणं मानलं जातं. सकाळच्या थंड वातावरणात सायकलिंग, निसर्गभ्रमंती आणि बोटिंगचा आनंद घेता येतो.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानल्या जातात. दगडात कोरलेली शिल्पकला आणि शांत परिसर यामुळे इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे.
कांदिवलीहून कमी वेळात पोहोचता येणारा गोराई बीच शांत आणि तुलनेने कमी गर्दीचा मानला जातो. संध्याकाळच्या वेळी समुद्राच्या वाऱ्यामुळे उकाड्यापासून मोठा आराम मिळतो.
गोराई परिसरातील हे भव्य पॅगोडा ध्यान आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. विशाल सुवर्ण घुमट आणि समुद्रकिनाऱ्यालगतचं वातावरण मनाला शांतता देतं. शहराच्या गोंगाटापासून दूर काही तास निवांत घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानलं जातं.
कांदिवलीपासून सहज पोहोचता येणारा अक्सा बीच स्वच्छ आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. सकाळी किंवा संध्याकाळी येथे फिरताना समुद्राच्या गार वाऱ्यामुळे हवामान आल्हाददायक वाटतं.