Manasvi Choudhary
टीव्ही ही प्रत्येकाच्या घरात असते. लहानापांसून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच टीव्ही बघायला आवडते.
मात्र तुमच्या कधी लक्षात आलय का? टीव्हीच्या स्क्रिनचा रंग काळा का असतो?
टीव्हीच्या आत एक काळ्या रंगाची कास असते. म्हणजेच त्यावर काळ्या रंगाचा रंग लावलेला असतो जो सर्वात महत्वाची भूमिका बजावतो.
टीव्हीच्या आत एक काळ्या रंगाची कास असल्याने टीव्हीतील एक्टिव्ह पिक्सल्स सराऊंड होतात. त्यामुळे आपल्याला टीव्हीवर रंगीत कार्यक्रम हे पाहायला मिळतात.
काळा रंग हा प्रकाशाचा उत्तम शोषक आहे. जेव्हा टीव्ही बंद असतो किंवा जेव्हा स्क्रीनवर एखादा गडद सीन सुरू असतो, तेव्हा आजूबाजूच्या प्रकाशाचे परावर्तन होऊ नये म्हणून स्क्रीन काळी ठेवली जाते.
टीव्ही बंद असताना तो घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात ठेवल्यावर एक 'ब्लॅक होल' किंवा 'गॅप' सारखा न वाटता, घरातील फर्निचरचा एक भाग वाटतो.