Manasvi Choudhary
पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचा निसर्ग हिरवागार आणि सुंदर दिसतो. निसर्गाच्या या वातावरणात फिरायला अनेकांना आवडते.
झाडांची पाने हिरवी असण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे 'क्लोरोफिल' नावाचे रंगद्रव्य
झाडांच्या पानांच्या पेशींमध्ये 'क्लोरोप्लास्ट' नावाचे घटक असतात, ज्यांच्यामध्ये 'क्लोरोफिल'मोठ्या प्रमाणात साठलेले असते. हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे, जे झाडांना त्यांचा मूळ हिरवा रंग प्रदान करते.
जेव्हा सूर्यप्रकाश पानांवर पडतो, तेव्हा क्लोरोफिल त्यातील निळा आणि लाल रंग शोषून घेतो. परंतू हिरवा रंग शोषून घेऊ शकत नाही.
हिरवा रंग शोषून न घेतल्यामुळे पानांवरून हा रंग परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, म्हणूनच आपल्याला पाने हिरवी दिसतात.
झाडांच्या पानांचा हिरवा रंग म्हणजे झाडाची 'ऊर्जा निर्मिती उत्तम प्रकारे काम करत असल्याचे लक्षण आहे.