Manasvi Choudhary
महिलांच्या दागिन्यांमध्ये चांदीच्या पैंजणाना विशेष महत्व आहे. लग्नसमारंभ, सण किंवा एखादा कार्यक्रम असो महिला पायात चांदीचे पैंजण घालतात.
आजकाल चांदीच्या पैंजणांमध्ये देखील अनेक डिझाईन्स आहेत. वजनाला हलक्या आणि आकर्षक दिसणाऱ्या पैंजणाचे लेटेस्ट डिझाईन्स पाहूया.
ज्यांना सिंपल पैंजण आवडतात त्यांच्यासाठी हे डिझाईन्स आहे. वजनला हलके असल्याने डेली वेअरसाठी तुम्ही हे पैंजण निवडू शकता.
लग्नसमारंभासाठी किंवा सणासुदीला साडीवर घुंगरू पैंजण अधिक उठून दिसते. घुंगरूचे पैंजण पायाची शोभा वाढवतात.
फुलांच्या नक्षीचे चांदीचे पैंजण महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. या डिझाईनमुळे पायांची शोभा खुलून येते.
मोती किंवा लहान मण्यांनी सजवलेले पैंजण तुम्ही निवडू शकता. हे पैंजण तुम्ही वेस्टर्न लूकवर देखील ट्राय करू शकता.
हृदयाच्या आकाराचे चार्म पैंजण मुलींमध्ये लोकप्रिय आहे. सध्या हे पॅटर्न ट्रेंडिग असल्याने मुली अधिक पसंत देतात.
लग्नसमारंभ किंवा पार्टीलूकसाठी तुम्ही खड्यांचे पैंजण निवडू शकता. हे पैंजण वजनला हलके आणि स्टायलिश दिसते.