पावसाळ्यात प्या गरमागरम मका आणि पालकचे सूप; घरी बनवण्याची पद्धतही आहे एकदम सोपी

Manasvi Choudhary

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी

पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरम आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते.

Monsoon

पालक आणि कॉर्न सूप

पालक आणि कॉर्न सूप हे चव आणि पोषण या दोन्हीसाठी उत्तम मानले जाते. पालक पालेभाजी आणि मका एकत्र करून तयार केलेले हे गरमागरम सूप तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Palak Corn Soup Recipe

साहित्य

सूप बनवण्यासाठी पालक, मक्याचे दाणे, बटर, लसूण, दूध किंवा पाणी, मिरी पावडर हे साहित्य घ्या.

Palak Corn Soup Recipe

पालकची पेस्ट बनवा

सर्वात आधी पालक स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर तो शिजवून घ्या आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करा.

Preparing Spinach Paste

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये बटर घाला. बटर वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि उकडलेले मक्याचे दाणे घाला. हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

Fodni

पालक पेस्ट मिक्स करणे

मका आणि लसूण चांगले परतून झाल्यावर, त्यामध्ये तयार केलेली पालकची पेस्ट घाला आणि सर्व मिश्रण एकत्र करा.

Spinach paste | yandex

दूध किंवा पाणी मिक्स करा

या मिश्रणात थोडे दूध किंवा पाणी मिक्स करा. दुधामुळे सूपला छान चव येते.

Adjusting Consistency

उकळून घ्या

सूपला चांगली उकळी आली की, त्यात चवीनुसार मिरी पावडर आणि मीठ मिक्स करा. गरमागरम आणि पौष्टिक पालक-मक्याचे सूप तयार आहे!

Boiling & Serving

NEXT: महागड्या फेशियल ऐवजी दह्याचा फेशियल करा, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक

येथे क्लिक करा...