महागड्या फेशियल ऐवजी दह्याचा फेशियल करा, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

हवामानातील बदल, धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचेवरची चमक कमी होते. अनेकदा महिला व मुली चेहऱ्यावर गुलाबी चमक येण्यासाठी महागडे फेशियल, स्पा करतात मात्र यामुळे चेहरा आणखी खराब होतो.

Skin Problem | Yandex

दहीचा त्वचेसाठी करा वापर

स्वयंपाकघरात दह्याचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. दहीमधील लॅक्टिक अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन बी असतात. जे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकतात आणि त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच दह्याचा वापर फेशियल म्हणून करा.

How To Use Curd

चेहरा स्वच्छ करा

फेशियल सुरू करण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ निघून जाईल.

Face Wash Tips

पॅक तयार करा

एका वाटीमध्ये दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा मध मिक्स करा.

Curd Face Pack

मसाज करा

ही तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.

Glowing Skin Tips

चेहरा धुवा

५ ते १० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्याने त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Glowing Skin Tips

टिप

येते दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

How To Do Facial At Home
येथे क्लिक करा...