ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पॅरिस शहर खूपच सुंदर आणि आधुनिक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील एका शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते? जाणून घ्या
जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. तसेच जयपूर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिध्द आहे कारण तेथील प्रत्येक गोष्ट गुलाबी रंगाने रंगवलेली आहे.
जयपूरला त्याच्या सुंदर आधुनिक इसारतींच्या बांधकामामुळे भारताचे पॅरिस म्हटले जाते.
सिटी पॅलेस, हवा महल आणि शीश महल हे सर्व जयपूरमध्ये बांधले गेले आहेत. जयपूरवर राज्य करणाऱ्या राजांनी हे निर्माण केले होते.
जयपूरमध्ये फिरण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. जयपूरमधील सौंदर्य बघून पर्यटक खुश होतात. परदेशातील पर्यटकसुध्दा येथे फिरण्यासाठी येतात.
जयपूरला जाणे अजिबात कठीण नाही. तुम्ही बसेस, ट्रेन आणि विमानाने जावू शकता, ज्यामुळे तुम्हाला तिथे पोहोचणे सोपे होईल.
तुम्ही तुमच्या कुटुंबासह भारताचे पॅरिस असलेल्या जयपूरची छान ट्रिप करु शकता. जयपूरमधील अनेक ठिकाणांना भेट देऊन, तेथील संस्कृतीचा आणि खाद्य पदार्थांचा अनूभव घेऊ शकता.