ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांसोबत ट्रॅव्हल प्लान करणे खूप मुश्किल होते. त्याच्या सोबत ट्रॅव्हल करणे म्हणजे लहान मुलांच्या सगळ्याच गोष्टी घ्याव्या लागतात.
जर तुम्हीसुध्दा लहान मुलांसोबत ट्रॅव्हल करणार असाल तर काही गोष्टी आहेत त्या नक्कीच जाणून घ्या.
जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर मुलांचे देखील तिकीट घ्या. लहान मुलांची तिकिटे देखील उपलब्ध आहेत. यामुळे तुम्हाला लांब रांग लावावी लागत नाही.
फ्लाईट किंवा ट्रेनचे टिकिट बुक करताना बाळाचे रुटिन लक्षात घेवून करावे. जेणेकरुन प्रवासात बाळ झोपले जाईल आणि प्रवास नीट होईल.
बेबी डायपर, मिल्क पावडर, बॉडी क्रिम, तेल आणि खाण्याच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सोबत घ्याव्या.
ऋतू कोणताही असो, फिरायला जाताना लहान बाळांचे कपडे नेहमी एक्स्ट्रा सोबत घ्या. लहान बाळांचे कपडे लवकर मळतात आणि ओलेसुध्दा होतात.
तसेच लहान बाळांची औषधे बॅगमध्ये पॅक करावी. काही लागणाऱ्या एक्स्ट्रा गोष्टी जसे की, डेटॉल, बोरोप्लस इत्यादी.
लहान मुले लवकर कंटाळतात आणि रडू लागतात, यासाठी त्यांची आवडती खेळणी सोबत घ्यावी.
फिरायला गेल्यावर लहान मुलांच्या आहारावर खास लक्ष ठेवावे. सारखे काही तरी भरवत राहा.