Surabhi Jayashree Jagdish
भारतात अनेक स्मारकं आहेत आणि त्यामध्ये लाईट्स लावले जातात. जेणेकरून ते रात्री चमकताना दिसतात.
मात्र ताजमहालमध्ये रात्री दिवे लावण्यात आलेले नाहीत. पण यामागचे कारण काय?
पांढऱ्या संगमरवरी बनवलेला हा ताजमहाल अतिशय सुंदर आहे. पण या पांढऱ्या संगमरवरामुळेच याठिकाणी लाइट शो होत नाही.
हे दिवे कीटकांना आकर्षित करतात आणि जेव्हा हे कीटक येतात. तेव्हा ते त्यांची विष्ठा याठिकाणी सोडतात, ज्यामुळे पांढरा संगमरवर खराब होऊ शकतो.
हे डाग ताजमहालचे सौंदर्य बिघडवू शकतात. घाणीमुळे झालेल्या खुणा कायम राहू शकतात. यामुळे रात्री लाईट्स न वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय.
1997 पासून ताजमहालवरील लाईट्स तसंच रोषणाई बंद आहे.