Sakshi Sunil Jadhav
तुम्ही कारने प्रवास करत असाल तर CNG भरतच असाल.
CNG भरताना वाहनचालक आणि सहप्रवाशांना गाडीच्या बाहेर उतरावे लागते.
CNG अत्यंत दाबाखाली टाकीमध्ये भरला जातो. जर टाकीत गळती, दोष किंवा तापमानाचा ताण असेल, तर स्फोट होण्याची शक्यता असते.
गाडीतील इलेक्ट्रिक डिव्हाइस सुद्धा या स्फोटाचे कारण बनू शकते.
कपड्यांमधून किंवा सीटमधून स्टॅटिक वीज निर्माण होऊ शकतो.
जर CNG गळतीबरोबर आली तर पेटण्याची शक्यता असते.
भारत सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने CNG भरताना गाडीच्या बाहेर उतरायचे नियम केले आहेत.
जर अचानक गळती, आग किंवा इतर समस्या निर्माण झाली, तर गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण होते.
CNG भरताना गाडी बंद करा, गाडीतून उतरा, गाडीपासून लांब राहा, फोन वापरू नका.